घरात इलेक्ट्रिक जीप बनवणाऱ्या तरुणाची लॉटरी! आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ गोष्ट; पाहा VIDEO!

WhatsApp Group

Anand Mahindra on Electric Jeep : भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारची क्रेझ वाढत आहे. जवळपास सर्वच ऑटोमेकर्स या सेगमेंटमध्ये नंबर वन होण्यासाठी स्पर्धा करत आहेत. पण असा एक व्यक्ती आहे, ज्यानं भंगार साहित्यापासून इलेक्ट्रिक जीप बनवली, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांना ही जुगाड जीप इतकी आवडली की त्यांनी पुढं काय केलं ते नक्की वाचा…

देसी इलेक्ट्रिक जीपचे कौतुक

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आणि भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दररोज ते काहीतरी ना काही ट्वीट करतात, जे व्हायरल होतात. यावेळीही त्यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ देसी इलेक्ट्रिक जीपचा आहे, जी तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं तयार केली आहे. जुगाडपासून बनवलेल्या या जीपला पेट्रोल किंवा डिझेलची गरज नसून ती बॅटरीवर चालते.

हेही वाचा – आनंद महिंद्रांच्या ‘पिकअप’ गाडीनं हापूस आंब्याच्या धंद्यात उठवलाय बाजार!

ही जीप तामिळनाडू येथील रहिवासी ए.के. गौतम यानं तयार केलीय. त्यानं हा पराक्रम ट्विटरवर टाकला आणि महिंद्रांच्या चेअरमन यांना टॅग केलं. आपल्या मेहनतीने बनवलेल्या या जीपचा व्हिडिओ शेअर करताना गौतमनं आनंद महिंद्रा यांच्याकडं नोकरीची विनंतीही केली. हा व्हिडिओ १७ ऑगस्टला ट्वीट करण्यात आला होता, ज्यावर आनंद महिंद्रा यांनी शनिवारी उत्तर देताना गौतमचं कौतुक केलं आहे.

आनंद महिंद्रा काय म्हणाले?

गौतमची इलेक्ट्रिक जीप पाहून आनंद महिंद्रा इतके थक्क झाले की त्यांनी ट्वीटला उत्तर दिले आणि कंपनीचे अधिकारी आर. वेलुस्वामी यांना या व्यक्तीशी त्वरित संपर्क साधण्यास सांगितलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, की ”यामुळेच मला विश्वास आहे की भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात अग्रेसर होईल. मला विश्वास आहे, की अमेरिकेसारख्या देशांनी कार आणि तंत्रज्ञानाबद्दल लोकांची आवड आणि गॅरेज ‘टिंकरिंग’च्या बळावर त्यांच्या नाविन्यामुळे ऑटो क्षेत्रात वर्चस्व मिळवले आहे. गौतम आणि त्याची ‘टोळी’ही खूप पुढे जाऊ शकते.”

हेही वाचा – चावरी नवरी..! नवऱ्याला इतकं चावलं आणि प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं; वाचा!

महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये गौतमच्या इलेक्ट्रिक जीपचं खूप कौतुक केलं. मागितलेल्या नोकरीच्या बाबतीतही गौतमला तत्काळ उत्तर मिळालं आणि त्याची मेहनत फळाला आली. आनंद महिंद्रांचं हे उत्तर गौतमचं नशीब पालटू शकतं. महिंद्रा ट्विटरवर सक्रिय आहेत आणि दररोज त्यांच्या पोस्ट आणि फोटोंवर नेटकऱ्यांची मतं असतात. ट्विटरवर त्यांचे ९४ लाख फॉलोअर्स आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment