अक्षय कुमारचं मराठी चित्रपटात पदार्पण! छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याविषयी म्हणाला…

WhatsApp Group

Akshay Kumar On Role Of Chatrapati Shivaji Maharaj : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही, परंतु त्याच्या खात्यात अजूनही अनेक चित्रपट आहेत जे लवकरच पडद्यावर येणार आहेत. अक्षय कुमार सतत मोठमोठे प्रोजेक्ट साईन करत असतो आणि आता अक्षय कुमारने मराठी चित्रपटात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल. हा अक्षय कुमारचा पहिला मराठी चित्रपट आहे.

बॉलिवूडमध्ये चित्रपटांचा आलेख सातत्याने घसरत असतानाच आता अक्षय मराठी चित्रपटांमध्ये आपली स्टाईल दाखवणार आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये राजा-महाराजाची भूमिका साकारल्यानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा चित्रपट पडद्यावर अशीच भूमिका साकारताना दिसणार आहे. ”मी या भूमिकेसाठी माझा सगळा जोर लावेन”, असे अक्षयने यावेळी सांगितले.

हेही वाचा – ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा CM एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!

काय म्हणाला अक्षय?

प्रसारमाध्यमांशी बोलताना अक्षय म्हणाला, की मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या सलमान खान आणि रितेश देशमुखसारख्या कलाकारांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे आणि त्यांना ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ कडून खूप अपेक्षा आहेत. त्यांना खुल्या मनाने स्वीकारेल. या घोषणा कार्यक्रमात सलमान खान देखील सहभागी झाला होता. २०२३ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो अशी माहिती आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment