सिंगापूर होणार धारावी! अदानींची कामाला सुरुवात, जाणून घ्या प्लॅन

WhatsApp Group

मुंबईतील प्रसिद्ध झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाची (Dharavi Redevelopment Project) जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धारावीच्या विकासासाठी अदानी समूह आणि मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्र काम करत आहेत. आता अदानी समूहाने या प्रकल्पाची जबाबदारी एका ग्लोबल टीमकडे सोपवली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRPPL) नुसार, त्यांनी वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर (Hafeez Contractor), अमेरिकन डिझाईन फर्म सासाकी (Sasaki) आणि ब्रिटीश कन्सल्टन्सी फर्म बुरो हॅपोल्ड (Buro Happold)यांच्याशी भागीदारी केली आहे. हाफीज कॉन्ट्रॅक्टरला अनेक सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याचा अनुभव आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, धारावी, न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कएवढी आहे. त्यात लाखो लोक राहतात. या छोट्याशा परिसरात हजारो छोटी घरे बांधण्यात आली आहेत. धारावी झोपडपट्टी ही देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील एक गरीब वसाहत आहे. या भागातील हजारो लोकांना शुद्ध पाणी आणि स्वच्छ शौचालये उपलब्ध नाहीत.

हेही वाचा – शुद्ध सेंद्रिय गूळ विकून करतोय लाखोंची कमाई, वाचा तरुण शेतकऱ्याची Success Story

अदानी समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी $619 करोड डॉलरची बोली लावली होती. या अंतर्गत अदानी समूहाला 625 एकर (253 हेक्टर) क्षेत्र विकसित करायचे आहे. जगातील सर्वात मोठी शहरी विकास योजना म्हणून याचे वर्णन केले जात आहे. डीआरपीपीएलची स्थापना जुलैमध्ये झाली.

पहिला प्रयत्न 1980 मध्ये

या प्रकल्पाला विरोध असतानाही काम केले जात आहे. धारावीच्या विकासासाठी 1980 मध्ये पहिल्यांदा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कोणत्या ना कोणत्या कारणाने हा प्रकल्प दरवेळी लांबणीवर पडत गेला. महाराष्ट्र सरकारने अखेर जुलैमध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतरही या प्रकल्पाविरोधात वारंवार निदर्शने सुरू आहेत. धारावीतील आंदोलक रहिवाशांना सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने धमकावले जात असल्याचा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment