Sherlyn Chopra Complaint Against Sajid Khan : बॉलिवूड चित्रपट निर्माता साजिद खानच्या अडचणीत वाढ होत आहे. बिग बॉसमध्ये असलेला आणि #MeToo आरोपी साजिद खानला पाहून अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे. त्यापैकी एक म्हणजे शर्लिन चोप्रा. शर्लिनने साजिदवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. शार्लिनने मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात साजिद खानविरोधात लैंगिक छळाची तक्रारही दाखल केली आहे.
पोलीस स्टेशनबाहेर माध्यमांशी बोलताना शर्लिन म्हणाली. ”मी साजिद खानविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. साजिद खानला तुरुंगात टाकावे, कारण कोणीही कायद्याच्या वर नाही. साजिदने मला त्याचे गुप्तांग दाखवून त्याला स्पर्श करण्यास सांगितले होते. मग या घटनेला एवढी वर्षे झाल्यानंतर एखादी स्त्री आपल्या वेदना सांगू शकत नाही का? आज आपण जे पाहतोय ते म्हणजे विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला ‘बिग बॉस’मध्ये पाहुणे म्हणून व्यासपीठ दिले जाते. हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे.”
हेही वाचा – Viral Video : डोळ्यात पाणी येणारच..! ‘मित्र’ जग सोडून गेल्यानंतर माकडानं केलं असं काही की…
#WATCH | Sherlyn Chopra files Police complaint, accuses #SajidKhan of sexual harassment-criminal intimidation in '05
Says,"Didn't have courage earlier to file complaint against a big name like him, after #MeToo women stepped forward. He should be jailed"
(Note: Graphic content) pic.twitter.com/dPrC6p4rCF
— ANI (@ANI) October 20, 2022
#MeToo आरोपी- #SajidKhan के ख़िलाफ़ कल मैंने जुहू पुलिस स्टेशन में यौन शोषण, क्रिमिनल फ़ोर्स, क्रिमिनल इंटिमिडेशन की शिकायत दर्ज की।
आशा करती हूँ कि जल्द से जल्द क़ानूनी कार्रवाई शुरू हो।@AmitShah @ianuragthakur @mieknathshinde @Dev_Fadnavis @NCWIndia @DCWDelhi @Maha_MahilaAyog pic.twitter.com/sBgTma8liS— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 20, 2022
टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये साजिद खान सामील झाल्याच्या बातमीनंतर पुन्हा #MeToo ची चर्चा सुरू झाली आहे. साजिदवर दोन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अभिनेत्री सिमरन सुरीने म्हटले होते, “मी अस्वस्थ आहे आणि लक्ष केंद्रित करू शकत नाही. २०१३ मध्ये आलेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान साजिदने मला कपडे काढण्यास सांगितले होते.”