कंगना रणौत शिंदे गटात जाणार? उद्या घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट!

WhatsApp Group

Kangana Ranaut To Meet Eknath Shinde : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. कंगना ही एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे भेट घेणार असल्याचे कळत आहे. ती त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलणार आहे. कंगना अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. त्यांनी यापूर्वीही अनेक विधाने केली आहेत, त्यानंतर त्यांच्यात आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. कंगनाने अनेकदा उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. तेव्हापासून शिवसेना आणि कंगना यांच्यात वाद आहे.

एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यानंतर कंगणाने त्यांचे अभिनंदन केले होते. ”यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे… ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनण्यापर्यंत… अभिनंदन सर”, असे कंगनाने शिंदेंचा फोटो शेअर करत म्हटले होते. कंगना रणौत आणि एकनाथ शिंदे यांची शनिवारी होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता ती राजकारणात पाऊल ठेवणारा का? ती शिंदे गटात जाणार का? याचे उत्तर लवकरच मिळेल.

हेही वाचा – RBI Repo Rate Hike : आता होम लोनसोबत EMI ही महागणार..!

सध्या कंगना रणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. कंगना स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटातून अनेक सेलिब्रिटींचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. याशिवाय कंगनाच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेला टिकू वेड्स शेरू हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a comment