Actor Aditya Singh Rajput Death : प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूत याचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी आदित्य अंधेरी येथील त्याच्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. आदित्यच्या मित्राला तो इमारतीच्या 11व्या मजल्यावर असलेल्या घरात मृतावस्थेत आढळला. यानंतर, मित्र आणि इमारतीच्या वॉचमेन यांनी त्याला रुग्णालयात नेले, जिथे आदित्यला मृत घोषित करण्यात आले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आदित्यच्या मृत्यूमागे ड्रग्जचा ओव्हरडोस असू शकतो.
कोण आहे आदित्य सिंह राजपूत?
आदित्य सिंह राजपूतची इंडस्ट्रीत चांगली ओळख आहे. त्याचे अनेक लोकांशी संबंध होते. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. काही टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा ब्रँड पॉप कल्चर सुरू केला. या ब्रँडखाली तो कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत असे. त्याने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना इंडस्ट्रीत लॉन्च केले.
हेही वाचा – Tata कडून मोठा धमाका..! दोन सिलिंडरवाली CNG गाडी लाँच; किंमत…
Aditya Singh Rajput, an actor, model, and photographer, was found dead in the bathroom of his Andheri home on May 22. At the hospital, he was declared dead.#adityasinghrajput #etimestv pic.twitter.com/2JH2ZK5agN
— ETimes TV (@ETimesTV) May 22, 2023
आदित्यच्या आकस्मिक निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कालपर्यंत पार्टी करणारा आणि हसणारा आदित्य आज या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसणे कठीण आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या आदित्य सिंह राजपूतचे मॉडेलिंग करिअर उत्तम होते. त्यांनी ‘क्रांतिवीर’ आणि ‘मैंने गांधी को नही मारा’ या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तो टीव्हीवरील जवळपास 300 जाहिरातींमध्ये दिसला होता. स्प्लिट्सविला या टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही तो दिसला होता.
आदित्य सिंह राजपूतने वयाच्या 17व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. त्याचे कुटुंब उत्तराखंडचे आहे. त्याच्या पश्चात आईवडिलांसोबत एक मोठी बहीण आहे, जी लग्नानंतर अमेरिकेला शिफ्ट झाली. आदित्यने मुंबईत येऊन करिअर घडवले. त्याने चित्रपट आणि जाहिरातींमध्ये तसेच CIA (CAMBALA Investigation Agencies) या टीव्ही शोमध्ये काम केले.