ABVP Stops Drama Play In Aurangabad University : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका नाटकादरम्यान मोठा वाद पाहायला मिळाला. या विद्यापीठातील युवक महोत्सवात एक नाटक बंद पाडण्यात आले. नाटकांचे सादरीकरण सुरु असताना एक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नाटकात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप काही जणांनी घेतला. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक बंद पाडले.
नाटक सुरू असताना सीता या पात्रातील महिलेने ‘झाल्या तिन्ही सांझा’ या गाण्यावर लावणीवर नाच करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांमधील अनेकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर मंचावरून कलाकरांना आतमध्ये पाठवणयात आले. नाटाकाचा प्रयोग थांबवण्यात आला. तसेच सभागृहात जय श्रीराम अशा घोषणाही देण्यात आल्या. आपल्या सीटवर उभे राहत या लोकांनी नाटक बंद पाडले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या नाटकातील संवाद आणि पात्रांवरुन भावना दुखावल्याचे आरोप केले आहेत.
हेही वाचा – “महाराष्ट्रासमोर, सिंधुदुर्गाच्या जनतेसमोर…”, नितेश राणेंचा वैभव नाईकांवर खळबळजनक आरोप!