बेडरूम आणि हॉल महाराष्ट्रात, तर किचन तेलंगणात..! दोन राज्यांच्या सीमेवरचं घर चर्चेत; पाहा फोटो!

WhatsApp Group

A House In Maharashtra and Telangana : तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्ही ज्या घरात राहत आहात ते दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे? विचार करायला विचित्र वाटत असले तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असे घर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिवती तहसीलच्या महाराजागुडा गावात पवार कुटुंब महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात राहतं. या कुटुंबात १३ सदस्य आहेत, जे कधी महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या खोल्यांमध्ये राहतात तर कधी तेलंगणामध्ये पडणाऱ्या घराच्या भागात राहतात. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर बांधलेले हे घर चर्चेत आहे. खरे तर हे घर दोन्ही राज्यात येते. निम्मे घर महाराष्ट्रात आणि अर्धे तेलंगणात आहे. दोन राज्यात विभागलेल्या या घराचे स्वयंपाकघर तेलंगणात आहे, तर बेडरूम आणि हॉल महाराष्ट्रात आहे. लोकांना ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल पण हे वास्तव आहे.

नक्की मॅटर काय?

महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये वसलेल्या या घरात सर्वजण आनंदाने राहतात. घराचे मालक उत्तम पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले, ”या घरात आम्ही १२-१३ लोक राहतो. माझ्या भावाला तेलंगणात चार खोल्या आहेत आणि माझ्याकडे महाराष्ट्रात चार खोल्या आहेत. माझे स्वयंपाकघर तेलंगणात येते. १९६९ मध्ये जेव्हा सीमा सर्वेक्षण केले जात होते तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की आमचे अर्धे घर तेलंगणात आणि अर्धे महाराष्ट्रात आहे. आतापर्यंत आम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. मात्र, दोन्ही राज्यातील ग्रामपंचायतींचा कर आम्ही भरत आहोत. तेलंगणा सरकारच्या योजनांचा आम्हाला अधिक लाभ मिळतो.”

हेही वाचा – Maruti Omni EV : जुनं ते सोनं..! इलेक्ट्रिक अवतारात येणार मारुती ओम्नी? जाणून घ्या सत्य!

दोन राज्यांमध्ये बांधलेल्या घरात राहणाऱ्या उत्तम पवार यांना काही अडचण नसली तरी हल्ली सीमेवरून दोन्ही राज्यांमध्ये वाद सुरू आहेत. ही दोन राज्ये म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आणि सांगितले की सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये एकमेकांविरुद्ध कोणताही दावा दाखल करणार नाहीत. बैठकीनंतर ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत कोणतेही राज्य दावा करणार नाही, असा करार आहे. हा वाद वाटाघाटीतून सोडवला जावा. प्रत्येक राज्यातून तीन मंत्र्यांची एक समिती बनवली जाईल.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment