

Fire In Mumbai Fashion street : मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. आगीचे कारण आणि त्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अजून माहितीची प्रतीक्षा आहे.
Maharashtra | Information about fire in shops at Fashion Street, Mumbai received. Fire tenders sent to the spot. More details awaited: BMC
— ANI (@ANI) November 5, 2022
#WATCH | Maharashtra: Fire broke out at 10-12 shops at Fashion Street in Mumbai today. It has now been extinguished. No casualties/injuries reported. pic.twitter.com/IboH8OMEkI
— ANI (@ANI) November 5, 2022
Fire at Fashion street now, seen from the hospital #Mumbai pic.twitter.com/Z663CJXRnK
— Dr. Rahul Baxi (@baxirahul) November 5, 2022
#Mumbai #Fire in shops of Fashion street. No report of injuries and casualty.
More details waited @mybmc @TV9Bharatvarsh @TV9Marathi pic.twitter.com/JKpN51U7EG— Mayuresh Ganapatye (@mayuganapatye) November 5, 2022
डोंबिवलीतील इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आग
त्याचवेळी महाराष्ट्रातील ठाण्यातील डोंबिवली परिसरात एका इमारतीच्या १५व्या मजल्यावर आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ९० फूट अंतरावरील सर्वोदय हिलच्या इमारतीत ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या डोंबिवलीत दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये आग लागली होती, जी नंतर इमारतीच्या १५व्या मजल्यावर विजेच्या तारांद्वारे पोहोचली. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा – धान खरेदीसाठी घर बसल्या ‘महानोंदणी’ मोबाईल ॲपचा शुभारंभ
नाशिकजवळील शालिमार एलटीटी एक्स्प्रेसला भीषण आग
याआधी शनिवारी सकाळी ८:४५ वाजता महाराष्ट्रातील नाशिकजवळ शालिमार एलटीटी एक्स्प्रेसच्या सामानाच्या डब्यात आग लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गाडी येण्यास उशीर झाला. पुणे अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सोपान नगर येथील अहमदनगर रोडवरील एका गोदामाला गुरुवारी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.