Pune Police : पुणेकरांनो लक्ष द्या..! ३१ डिसेंबरचा प्लॅन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

WhatsApp Group

Pune Police : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कंबर कसली आहे. त्याअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २७०० पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे. विशेषत: दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दुसरीकडे, पुणेकर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करा, मात्र शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील विविध भागात नाकाबंदी करण्यात येणार आहे.

दरवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात, तर अनेक ठिकाणी पार्ट्या आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एफसी रोड आणि जंगली महाराज रोडवर तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विमानतळ, कोरेगाव पार्क आणि चतुश्रृंगी भागात मोठ्या संख्येने लोक जमतात.

हेही वाचा – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! मिळणार १५,००० रुपये बोनस; शिंदे सरकारची ‘मोठी’ घोषणा!

पोलिसांनी आवाहन

नवीन वर्षाचे स्वागत करून जल्लोष करावा व पोलीस नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

पोलीस पूर्ण सतर्क

गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. विशेषत: कॅम्प परिसर, विविध मॉल्स, हॉटेलमध्ये नागरिक जमतात. या पार्श्वभूमीवर मॉल्स, लॉज, ढाबे, बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. रेकॉर्डसह संशयित आणि गुन्हेगारांच्या कुंडलीची छाननी करण्यावर भर दिला जात आहे. बंदोबस्तात कोणतीही दुर्घटना किंवा चेंगराचेंगरी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुंडागर्दी आणि गोंधळ घालणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

हेही वाचा – UPSC Interview Questions : माणसाची अशी कोणती गोष्ट आहे, जी दरवर्षी वाढते?

गर्दीच्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके तैनात

बॉम्ब निकामी पथकासह श्वानपथकाद्वारे महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेतला जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांना काही आक्षेपार्ह समस्या असल्यास पुणे शहर नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26126296 / 8975953100 (Whatsapp क्रमांक), 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यावर लक्ष ठेवणार आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment