Mysterious Tunnel In Sir JJ Hospital Mumbai : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचबरोबर देशातील सर्वात जुनी हेरिटेज वास्तूही मुंबईत आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबईत भव्य इमारत बांधण्यात आली. मुंबईत अशा अनेक इमारती आहेत, ज्या आजही आकर्षणाचे केंद्र आहेत. मुंबईतील सर जेजे रुग्णालय हे देखील हेरिटेज इमारतींपैकी एक आहे. हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सरकारी रुग्णालय देखील आहे.
मुंबईतील हेरिटेज इमारतींमध्ये अनेकदा भूमिगत बोगदे सापडले आहेत. यावेळी सर जेजे हॉस्पिटलमध्ये भूमिगत भूयार सापडले आहे. हे भूयार १३० वर्षे जुने आणि २०० मीटर लांब आहे. हे भूयार हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. अरुण राठोड यांना हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत असताना सापडले. त्याची माहिती पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.
हेही वाचा -वदिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बनला Byju’s चा ब्रँड अॅम्बेसेडर!
A 200-metre long tunnel discovered under the nursing complex of #JJHospital in #Byculla . The hospital is believed to have made the discovery two days ago while undertaking some digging work. pic.twitter.com/5nljqmCS3y
— TOI Mumbai (@TOIMumbai) November 4, 2022
हे भूयार जेजे रुग्णालयाच्या २ इमारतींना जोडतो. सर जेजे रुग्णालयाच्या इमारती १७७ वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या होत्या. या इमारती सर जमशेटजी जीजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने बांधल्या गेल्या. जमशेटजी जीजीभॉय यांनी १६ मार्च १८३८ रोजी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपये दान केले.
त्यानंतर ३० मार्च १८४३ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली. १५ मे १८४५ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेटजी जीजीभॉय हॉस्पिटल वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी उघडण्यात आले.