गणेश विर्सजन करताना चिमुरड्यांसह ११ जणांना इलेक्ट्रिक शॉक; पनवेलमधील दुर्घटना!

WhatsApp Group

Ganesh Idol immersion Accident Panvel : गणेश विसर्जनागदरम्यान पनवेलमध्ये मोठी घटना घ़़डली आहे. वडघर कोळीवाडा येथील गणेश विसर्जन घाटावर जनरेटरची तार तुटल्यानं विजेचा धक्का लागून ११ गणेशभक्त जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी आठ जणांना ग्रामीण रुग्णालयात तर दोघांना लाईफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हर्षद पनवेलकर (३२), मानस कुंभार (१७), रुपाली पनवेलकर (३५), रितेश पनवेलकर (३८), निहाल चोणकर (५), सर्वम पनवेलकर (१५), दिलीप पनवेलकर (६५), दिपाली पनवेलकर (२४), वेदांत कुम्हार (१८), दर्शन शिवशिवकर (३६), तनिष्का पनवेलकर (९ महिने) अशी जखमींची नावं आहेत. पनवेल पोलिसांनी ही माहिती दिली. या माहितीनुसार, घाटावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा इथं जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी जनरेटरची वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली. या तरुणाच्या मदतीसाठी गेलेले ११ जण विजेचा धक्का लागून जखमी झाले. यावेळी मनपा कर्मचारीही उपस्थित होते.

हेही वाचा – पाळीव कुत्र्याचा तरुणाच्या गुप्तांगाला चावा..! मालकाकडून नुकसान भरपाईची मागणी

विसर्जनावेळी देशात ‘वाईट’ घटना

देशातील विविध राज्यांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी अनेक अपघात झाले आहेत. महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये गणपती मूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हरयाणातील महेंद्रगढ येथील झगरोली कालव्यात गणेशमूर्तीसह आठ जण वाहून गेले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, सोनीपतमध्ये यमुना नदीत बुडून २ जणांचा मृत्यू झाला, तर २ अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. संत कबीर नगर येथील आमी नदीत गणपती विसर्जन करताना ४ मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. चौघेही भाऊ-बहीण होते. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचवेळी ललितपूर आणि उन्नावमध्ये विसर्जनाच्या वेळी बुडून २-२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी घातला ४१,२५७ रुपयांचा टी-शर्ट? काँग्रेस म्हणालं, “मोदीजींचा…”

हरयाणातील महेंद्रगड आणि सोनीपत येथे गणपती विसर्जनाच्या वेळी दोन अपघात झाले. कनिना-रेवाडी रस्त्यावरील झगडोली गावाजवळील कालव्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले ९ जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा ८ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. आणखी ४ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच सोनीपत येथील यमुना घाटात बुडून ३ जणांचा मृत्यू झाला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment