जगातील सर्वात महागडे खायचे पदार्थ (World’s Most Expensive Foods In Marathi) कोणते आहेत हे तुम्हाला माहितीये का? बहुतेकांना याविषयी काही माहीत नसेल. कारण जगातील सर्वात महागड्या पदार्थांमध्ये अशी अनेक नावे आहेत जी दुर्मिळ मानली जातात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की अशआ अनेक पदार्थांच्या एका प्लेटची किंमत लाखो रुपये असते आणि ते खाणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते.
अल्मास कॅविअर (Almas Caviar) हा जगातील सर्वात महागडा खाद्यपदार्थ मानला जातो. यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, कॅविअर स्टर्जन (Sturgeon) माशांच्या अंडाशयात आढळणाऱ्या अंड्यांना अल्मास कॅविअर म्हणतात. Almas caviar ची भारतीय रुपयात किंमत सुमारे 29 लाख रुपये (USD 34500) प्रति किलोग्रॅम आहे. हे कॅविअर इराणी बेलुगा स्टर्जन माशापासून मिळते, ज्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. इराणजवळील कॅस्पियन समुद्राच्या स्वच्छ भागांमध्ये बेलुगा स्टर्जन माशांची दुर्मिळ प्रजाती आढळून आल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केशरची (Saffron)गणना जगातील सर्वात महागड्या खाद्यपदार्थांमध्ये केली जाते. केशर हा एक प्रकारचा मसाला आहे, ज्याची अनोखी चव आणि सुगंध त्याला खास बनवतो. अनेक भारतीय पदार्थांमध्येही केशर वापरले जाते. केशराचा सुगंध लोकांना खूप आवडतो. रिपोर्ट्सनुसार, एक ग्रॅम केशरची किंमत सुमारे 1600 रुपये आहे. या पद्धतीने पाहिले तर एक किलो केशराची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे. केशर सामान्यतः इराणमध्ये घेतले जाते आणि जगभर वापरले जाते.
ब्लूफिन टूना माशाची (Bluefin Tuna) गणना जगातील सर्वात महागड्या खाद्यपदार्थांमध्ये केली जाते. माशांची ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. ब्लूफिन टूना हा जपानच्या सुशी आणि साशिमी पदार्थांचा प्रमुख भाग आहे. ब्लूफिन ट्यूनाचे वजन सुमारे 200-250 किलो असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्लूफिन ट्यूनाची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे, परंतु लिलावात त्याची किंमत करोडो रुपयांपर्यंत पोहोचते. यावर्षी जपानमध्ये 212 किलो वजनाच्या ब्लूफिन माशाचा 2.27 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला.
हेही वाचा – 1 पेग, 2 पेग, 3 पेग… दररोज किती दारू पिणे सुरक्षित आहे?
तुर्कीमध्ये आढळणारा एक अनोखा प्रकार (Elvish Honey) देखील या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा मध तुर्कीमधील आर्टविन शहरातील 1,800 मीटर खोल गुहेतून काढला जातो. या मधात मधमाशांचे पोळे नसते. एल्विश मध नैसर्गिकरित्या जंगली फुलांच्या परागकणांमधून गोळा केला जातो आणि नंतर गुहेत द्रव म्हणून प्रक्रिया केली जाते. त्याच्या चव आणि अद्वितीय स्थानामुळे, एल्विश मधाची किंमत 4.44 लाख रुपये प्रति किलो आहे.
इबेरिको हॅम (Iberico Ham)हा काळ्या डुकराच्या मागच्या पायाचा भाग आहे, जो जगातील सर्वात महागड्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. हे 24 ते 36 महिन्यांपर्यंत परिपक्व होते आणि पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये तयार केले जाते. प्रक्रिया केल्यानंतर हे मांस खारट, वाळवले जाते आणि तीन वर्षांसाठी साठवले जाते. इबेरिको हॅमची किंमत सुमारे 3.75 लाख रुपये आहे. गुणवत्तेनुसार त्याची किंमत कमी-अधिक असू शकते. हे पातळ तुकड्यांमध्ये सर्व्ह केले जाते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!