मुंबई : हॅलो…हाऊ आर यू….यू फाईन ना….ओक्के ओक्के.. असं बोलताना आपल्याला ऐकायला आल्यानंतर समोरच्या माणसानं दारू प्यायल्याचं कळतं. दारू लोक अनेकदा इंग्रजीत बोलू लागतात. ‘शोले’मध्ये वीरूनं टाकीवर चढल्यानंतर बोललेला ‘चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग’ हा डायलॉग कोण विसरू शकतं? आपल्या जवळपासही दारू प्यायल्यानंतर अनेकांच्या आतील वीरू बाहेर येऊ लागतो. पण तुम्हाला माहितीये का की दारू प्यायल्यानंतर लोक इंग्रजी का बोलतात ते?
‘जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी’ या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्चनुसार, थोडीशी दारू प्यायल्यानंतर जी नशा येते ती दुसरी भाषा बोलण्यात मदत करते. लिव्हरपूल विद्यापीठ, ब्रिटनचे किंग्ज कॉलेज आणि नेदरलँडमधील मास्ट्रिच विद्यापीठातील संशोधकांनी नुकतेच डच भाषा शिकलेल्या आणि डच भाषा बोलल्या जाणाऱ्या नेदरलँड्समध्ये शिकत असलेल्या ५० जर्मन लोकांचा एका कोर्समध्ये समावेश केला. या लोकांनी हल्लीच डच भाषा शिकली.
असं का होतं?
मद्यपान केल्यावर आपली भाषा का बदलते? भाषा म्हणजे काय? भाषा ही देखील आपल्या वागण्याचा एक मार्ग आहे. ज्या वर्तनानं आपण आपले शब्द एकमेकांना कळवतो. मद्यपान केल्यानंतर आपल्या वागण्यात बदल होतो, त्याचाच एक भाग म्हणजे भाषेतील बदल. वास्तविक, दारू आरोग्यासाठी घातक मानली जाते, परंतु जे लोक दारू पितात त्यांच्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येतं. दारूच्या नशेत गुरफटलेले हे लोक पूर्ण आत्मविश्वासानं आपला मुद्दा कोणाच्याही समोर ठेवतात. जर हिंदी ही तुमची मातृभाषा असेल आणि इंग्रजी ही तुमची दुसरी भाषा असेल तर अनेक वेळा तुम्ही कोणाच्याही समोर इंग्रजी बोलण्यास संकोच करता जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये. ज्यांना नवीन भाषा शिकण्याची भीती वाटते, त्यांना ती नवीन भाषा बोलण्यास आणि शिकण्यास दारू मदत करते.
हेही वाचा – कमाईवाली शेती..! तुळशीचं उत्पन्न म्हणजे कमी गुतंवणूक जास्त नफा; वाचा सविस्तर!
मेमरी आणि एकाग्रतेवर परिणाम
परंतु दुसरीकडं, दारू मेमरी आणि लक्ष यांच्यावर नकारात्मक परिणाम करते. यात अतिसंवेदनशीलता आणि आत्म-मूल्यांकन देखील समाविष्ट आहे. सामान्यतः ज्या लोकांचं इंग्रजी भाषेवर कमकुवत आकलन असतं, ते कोणाच्याही समोर इंग्रजी भाषेत बोलायला घाबरतात. पण दारू प्यायल्यावर तेच लोक बिनधास्त इंग्रजी बोलू लागतात कारण दारू प्यायल्यावर त्यांची भीती निघून जाते आणि ते मोकळेपणाने बोलू शकतात.
साधारणपणे, इंग्रजी भाषेत असे अनेक कठीण शब्द आहेत, ज्याचा उच्चार प्रत्येकाला नीट करता येत नाही, पण अभ्यासात असं आढळून आले आहे की, ज्यांचा उच्चार बरोबर होत नाही ते मद्यपान केल्यावरही शब्द बरोबर उच्चारू शकतात. मद्यधुंद अवस्थेत बोलताना व्यक्तीच्या तोंडून शब्दांचे उच्चार पूर्वीपेक्षा चांगले होऊ लागतात.