भारतातील ‘हे’ २ कफ सिरप मुलांपासून ठेवा दूर..! जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय इशारा

WhatsApp Group

WHO On Indian Cough Syrups : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. ही औषधे लहान मुलांसाठी वापरू नयेत, असा सल्ला संस्थेने दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की कंपनीचे दोन कफ सिरप गुणवत्तेचे मानक पूर्ण करत नाहीत आणि त्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. उझबेकिस्तानमधील १९ मुलांच्या मृत्यूचे प्रकरण या कंपनीने बनवलेल्या कफ सिरपशी संबंधित आहे.

WHO ने म्हटले आहे की, कंपनीची दोन औषधे Ambronol सिरप आणि DOK-1 Max सिरप बाजारात विकली जाण्यापासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत. या फार्मास्युटिकल कंपनीचे कार्यालय नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे.

मुलांचा मृत्यू लक्षात घेऊन, उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दोन्ही सिरपची तपासणी केली होती, त्यात असे दिसून आले की दोन्ही औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे मुलांचा मृत्यू झाला. मंत्रालयाने सांगितले की, श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त २१ मुलांनी ही औषधे घेतली होती, त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – UPSC Interview Questions : भारताची पहिली महिला IAS अधिकारी कोण? द्या ‘अशा’ प्रश्नांची उत्तर!

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या औषधांच्या सुरक्षेबाबत आणि दर्जाबाबत मरीनने अद्याप WHO ला हमी दिलेली नाही. उझबेकिस्तानमधील मृत्यूची बातमी आल्यानंतर लगेचच भारताच्या आरोग्य मंत्रालयाने कंपनीतील औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली होती. आता गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारने कंपनीचा परवाना रद्द केला.

मरीन बायोटेक २०१२ पासून उझबेकिस्तानमध्ये नोंदणीकृत आहे आणि त्याच वर्षापासून ती उत्पादित औषधे विकत आहे. मात्र, या कंपनीची औषधे भारतात विकली जात नाहीत.
गेल्या आठवड्यात, उझबेकिस्तानमधील १९ मुलांच्या कफ-सिरप-संबंधित मृत्यूची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी चार जणांना अटक केली. यापूर्वी गांबियामध्येही कफ सिरपमुळे ७० मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गॅम्बियाच्या संसदीय समितीने या मृत्यूंचा संबंध नवी दिल्लीस्थित मेडेन फार्मास्युटिकल्सने बनवलेल्या कफ सिरपशी जोडला.

कंपनीने औषधाच्या गुणवत्तेत कोणताही गडबड झाल्याचे नाकारले असले तरी. भारत सरकारने औषधाची चाचणी केली, त्यात कोणतेही दोष आढळले नाहीत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment