चुकून डिलीट केलेले मेसेज करू शकता UNDO..! WhatsApp ने आणले नवे Accidental Delete Feature

WhatsApp Group

WhatsApp Accidental Delete Feature : व्हॉट्सअॅपने अॅक्सिडेंटल डिलीट फीचर आणले आहे. खरं तर, अनेक वेळा चुकीचा मेसेज चुकीच्या ग्रुपवर पाठवला जातो, त्यानंतर यूजर्स तो मेसेज पटकन डिलीट करण्यासाठी ‘Delete for Me’ पर्यायावर क्लिक करतात. हा संदेश फक्त तुम्हाला दिसत नाही. परंतु ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या सर्व वापरकर्त्यांना ते दृश्यमान आहे. अशाप्रकारे, एकदा तुम्ही Delete For Me या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही ते सर्वांसाठी पुन्हा हटवू शकत नाही. ज्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून WhatsApp ने Accidental Delete हे नवीन फीचर आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध करून दिलॆ आहे.

व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून चुकून डिलीट केलेले मेसेज ‘UNDO’ केले जाऊ शकतात. व्हॉट्सअॅपच्या नवीन Accidental Delete फीचरमध्ये विंडोज यूजर्स डिलीट केलेले मेसेज ५ सेकंदात UNDO करू शकतील.

२०१७ मध्ये डिलीट फॉर एव्हरीवन फीचर आले होते 

WABetaInfo रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपने  २०१७ मध्ये डिलीट फॉर एव्हरीवन हा पर्याय सादर केला होता. वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काढून टाकण्यासाठी हे फिचर सुरू करण्यात आले आहे. दरमायन, याची बीटा चाचणी ऑगस्टमध्ये काही Android आणि iOS यूजर्स साठी करण्यात आली होती. 

हेही वाचा – Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सर्वात वाईट बातमी..! ८० कोटी लोकांना बसणार फटका

हे फीचर देखील लाँच

गेल्या महिन्यात, भारतात एक नवीन ‘मेसेज युवर सेल्फ’ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. हे फीचर तुम्हाला नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.

ही आश्चर्यकारक फीचर मिळतील

हे फीचर सध्या चाचणी मोडमध्ये आहे. व्हॉट्सअॅप बीटा 2.23.2.11 अपडेटसह हे फीचर प्रथम Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. कॉल लिंक, 32 लोकांना ग्रुप कॉल, कलर वेव्हफॉर्म, मेसेज म्यूट करणे यासारखे फीचर्स व्हॉट्सअॅपद्वारे दिले जाऊ शकतात. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलसाठी पिक्चर-इन-पिक्चर मोडवर काम करत आहे.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment