WhatsApp Rolls Out Communities Feature : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने एक उत्कृष्ट फीचर आणण्यास सुरुवात केली आहे, ज्याची यूजर्स बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरचे नाव कम्युनिटीज (Communities) आहे. व्हॉट्सअॅप कम्युनिटीजच्या जागतिक रोलआउटची घोषणा मार्क झुकरबर्गने केली होती. येत्या काही महिन्यांत ते व्हॉट्सअॅपच्या सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअॅप कम्युनिटीजच्या मदतीने यूजर्स एकाच वेळी अनेक ग्रुपशी कनेक्ट होऊ शकतात.
याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये आज आणखी तीन नवीन फिचर्स दाखल करण्यात आले आहेत. आता यूजर्स व्हिडिओ कॉलद्वारे एकाच वेळी ३२ लोकांशी कनेक्ट होऊ शकतील. त्याचबरोबर आता ग्रुपमधील १०२४ यूजर्ससोबत चॅटिंग करता येणार आहे. यासोबतच कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये पोल क्रिएटिंग फीचरही जारी केले आहे.
हेही वाचा – Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर..! ‘या’ दिवशी लागणार निकाल
Ah…good. Need to check this out. Groups are not the best format for many discussions.
'@WhatsApp officially launches its new discussion group feature, Communities' https://t.co/Av1xduOXhf …when will it be available in India?
— Amit Paranjape (@aparanjape) November 3, 2022
काय फायदा होणार?
व्हॉट्सअॅपच्या मते, कम्युनिटीज सर्वाधिक फायदा त्या यूजर्सना होईल ज्यांचे एकमेकांशी घट्ट नाते आहे. शाळा आणि संबंधित व्यवसाय हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यात अनेक गोष्टी साम्य आहेत. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरमुळे त्यांना त्यांचे संभाषण व्यवस्थित करण्यासाठी आणखी टूल्स मिळतील. शाळकरी मुलांचे पालक, स्थानिक क्लब आणि अगदी लहान कामाची ठिकाणेही त्यांच्या संभाषणासाठी आणि दैनंदिन कामांसाठी व्हॉट्सअॅप वापरतात. या गटांना त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सोशल मीडियापासून वेगळ्या पद्धतींची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप येत्या काही दिवसांत कम्युनिटीज चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी अनेक अपडेट्स आणणार आहे.