Whatsapp : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने ऑक्टोबरमध्ये भारतात २३ लाखांहून अधिक अकाउंट्सवर बंदी घातली आहे. नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा आकडा फक्त ऑक्टोबर महिन्याचा आहे. कंपनीने सांगितले की १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान, २३,२४,००० व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यापैकी ८,११,००० खाती सक्रियपणे बॅन करण्यात आली होती.
व्हॉट्सअॅप ४०० मिलियनहून अधिक यूजर्ससह, व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक जबाबदारी टाकण्यासाठी या नवीन नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
का घेतला हा निर्णय?
व्हॉट्सअॅपला ऑक्टोबरमध्ये भारतात ७०१ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३४ तक्रारींच्या नोंदी होत्या. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयटी नियम २०२१ नुसार, आम्ही ऑक्टोबर २०२२ महिन्यासाठी आमचा अहवाल प्रकाशित केला आहे. ताज्या मासिक अहवालात नोंदवल्याप्रमाणे, व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात २.३ मिलियनहून अधिक अकाऊंट्सवर बंदी घातली.
हेही वाचा – मुंबईमध्ये भर रस्त्यात कोरियन मुलीचा विनयभंग…! देशाला लाजवेल असा Video व्हायरल
प्रगत आयटी नियम २०२१ अंतर्गत, ५ मिलियनहून अधिक यूजर असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करावा लागेल. दरम्यान, खुल्या, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी इंटरनेटच्या दिशेने वाटचाल करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘डिजिटल नागरिकांच्या’ अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने काही सुधारणा अधिसूचित केल्या आहेत.