मुंबई : भारतातील बहुतेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं भारतात आहे. आपण अनेकदा रेल्वेनं प्रवास करतो. जेव्हा आपण रेल्वे स्टेशनवर असतो किंवा रेल्वेत बसलेले असतो तेव्हा रेल्वेच्या हॉर्नचा आवाज नक्कीच ऐकला असेल. अनेक वेळा आपल्याला वाटतं की रेल्वेच्या इंजिनमध्ये बसलेला ड्रायव्हर विनाकारण हॉर्न वाजवत राहतो. पण तसं नसतं. रेल्वे चालकाला कोणाला त्रास देण्याचा हेतू नसतो. रेल्वेचा हॉर्न एक असतो, पण तो वाजवण्याची पद्धत अनेक प्रकारची असते. सिग्नलनुसार रेल्वेचा हॉर्न वेगवेगळ्या पद्धतीनं वाजवला जातो, पण रेल्वेच्या वाजणाऱ्या प्रत्येक हॉर्नमागं एक कारण असतं. आता कोणत्या हॉर्नमागं नेमकं काय कारण आहे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून
छोटा हॉर्न
जर रेल्वेच्या ड्रायव्हरनं एक छोटा हॉर्न वाजवला तर त्याचा अर्थ असा होतो की, त्याला इतर कोणत्याही इंजिनच्या मदतीची गरज नाही.
एक छोटा आणि एक मोठा हॉर्न
रेल्वेचा ड्रायव्हर जेव्हा तो एक लहान आणि एक लांब हॉर्न वाजवतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्याला ट्रेनच्या मागे असलेल्या इंजिनची मदत हवी आहे.
हेही वाचा – रेल्वे स्टेशनची नावं नेहमी पिवळ्या बोर्डावर का लिहिलेली असतात? जाणून घ्या कारण!
दोन छोटे हॉर्न
जर रेल्वे उभी असेल आणि ड्रायव्हर दोन छोटे हॉर्न वाजवत असेल तर याचा अर्थ तो गार्डला रेल्वे तपासण्यासाठी परवानगी मागत आहे.
तीन छोटे हॉर्न
जर तुम्हाला रेल्वेच्या तीन छोट्या हॉर्नचा आवाज येत असेल तर समजून घ्या की रेल्वेचा ड्रायव्हर गार्डला ब्रेक लावण्यासाठी सिग्नल देत आहे.
चार छोटे हॉर्न
चार छोटे हॉर्न म्हणजे ड्रायव्हरला पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाहीये. रेल्वेच्या ड्रायव्हरला जेव्हा रस्ता मोकळा करण्यासाठी गार्डची मदत लागते तेव्हा तो चार छोटे हॉर्न वाजवतो.
हेही वाचा – भारतातील ‘असं’ हॉटेल, जिथं जेवणासाठी पैसे नाही तर प्लास्टिक द्यावं लागतं!
एक मोठा आणि एक छोटा हॉर्न
जर ड्रायव्हर एक मोठा आणि एक छोटा हॉर्न वाजवत असेल तर समजा की तो रेल्वे गार्डला ब्रेक सोडण्याचा इशारा देत आहे.
दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न
रेल्वेच्या गार्डला आपल्याकडे बोलावण्यासाठी ड्रायव्हर दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न वाजवतो.
सतत हॉर्न वाजवणं
याचा अर्थ रेल्वेच्या पुढं धोका आहे. चालकाला वाटेत कोणत्याही प्रकारचा अडथळा दिसला तर तो सतत हॉर्न वाजवतो.
दोन छोटे आणि एक मोठा हॉर्न
जर रेल्वेचा ड्रायव्हर दोन छोटे आणि एक मोठा हॉर्न वाजवत असेल तर याचा अर्थ एकतर प्रवाशानं रेल्वेतील चैन ओढली आहे किंवा गार्डने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.