Tulsi Vivah 2022 : तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. यावर्षी तुळशी विवाह शनिवारी ५ नोव्हेंबरला आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह होतो. असे मानले जाते की या दिवशी तुळशी विवाह विधिपूर्वक केल्याने जीवनात भगवान विष्णू आणि तुळशीचा आशिर्वाद प्राप्त होतो. तुळशी विवाहाचे शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया.
तुळशी विवाह २०२२ शुभ मुहूर्त
- तुळशी विवाह तारीख – ०५ नोव्हेंबर २०२२ शनिवार
- एकादशी तिथी सुरू होते – ०४ नोव्हेंबर संध्याकाळी ०६:०८ वाजता
- एकादशी तिथी समाप्त – ०५ ऑक्टोबर संध्याकाळी ०५:०६ वाजता
तुळशी विवाह पूजा पद्धत
तुळशी विवाह पूजेच्या पद्धतीनुसार, या पूजेला उपस्थित असलेल्या लोकांनी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. मात्र या दिवशी पूजा करताना काळे कपडे घालू नयेत. या दिवशी उपवास करावा लागतो. शक्य असल्यास हे फॉलो करा.
- या दिवशी शुभ मुहूर्तावर तुळशीचे रोप अंगणात जमिनीवर ठेवावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गच्चीवर किंवा मंदिरातही तुळशीविवाह करू शकता.
- तुळशीच्या भांड्याच्या मातीत ऊस लावावा आणि त्यावर लाल चुनरीने मंडप सजवावा.
- तुळशीच्या भांड्यात शालिग्राम दगड ठेवा.
- तुळशी आणि शाळीग्रामची हळद लावावी. यासाठी दुधात भिजवलेली हळद लावावी.
- उसाच्या मंडपावरही हळदीची पेस्ट लावावी.
- यानंतर पूजा करताना आवळा, सफरचंद इत्यादी या ऋतूत येणारी फळे अर्पण करा.
- पूजेच्या ताटात भरपूर कापूर टाकून ते जाळावे. यातून तुळशी आणि शाळीग्रामची आरती काढावी.
- आरती केल्यानंतर ११ वेळा तुळशीची प्रदक्षिणा करून प्रसाद वाटप करावा.
हेही वाचा – Gold Smuggling : चेन्नई विमानतळावर ४६ लाखांचं सोनं जप्त; Video पाहून म्हणाल काय डोकं लावलंय..!
तुळशी विवाहानंतर खालील मंत्राने भगवान विष्णूची पूजा करा.
उत्तिष्ठ गोविन्द त्यज निद्रां जगत्पतये
त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेदिदम्
उत्थिते चेष्टते सर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठ माधव
गतामेघा वियच्चैव निर्मलं निर्मलादिशः
शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव
तुळशी विवाहाचे महत्त्व
कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करणे खूप शुभ मानले जाते. तुळशीविवाहामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचबरोबर घरात सकारात्मकता राहते. यासोबतच या दिवशी तुळशीविवाह केल्याने कन्यादानाइतके पुण्य प्राप्त होते, असेही मानले जाते. ज्या घरात मुलगी नाही, त्या घरात तुळशीशी लग्न केले तर चांगलेच असते, असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूचा जागर झाल्यानंतर घरामध्ये शुभ कार्याला सुरुवात होते.