पान मसाला, तंबाखू आणि गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1 एप्रिलपासून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. जीएसटी काऊन्सिलकडून आज एक नवीन ॲडव्हायजरी (GST Rules For Tobacco Pproduct) जारी करण्यात आली असून, त्यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जीएसटीने जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार, तंबाखू उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांना 1 एप्रिलपासून त्यांच्या पॅकिंग मशीनची जीएसटी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागेल.
तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीने जीएसटी अधिकाऱ्यांकडे पॅकिंग मशिनरी नोंदणी न केल्यास कंपनीला एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
विधेयकातील दुरुस्तीनंतर निर्णय
सरकारच्या या पावलाचा उद्देश तंबाखू उत्पादन क्षेत्रातील महसुलाची गळती थांबवणे हा आहे. वित्त विधेयक, 2024 ने केंद्रीय GST कायद्यामध्ये सुधारणा सादर केल्या आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की तेथे नोंदणी न केलेल्या प्रत्येक मशीनवर 1 लाख रुपये दंड आकारला जाईल.
नोंदणीची प्रक्रिया
जीएसटी काऊन्सिलच्या शिफारशीच्या आधारे, कर अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी तंबाखू उत्पादकांकडून मशीनच्या नोंदणीसाठी विशेष प्रक्रिया सुरू केली. सध्याची पॅकिंग मशीन, नव्याने बसवलेल्या मशीन्ससह या मशीन्सच्या पॅकिंग क्षमतेचा तपशील फॉर्म GST SRM-I मध्ये द्यावा लागेल. मात्र, गेल्या वर्षी यासाठी कोणत्या प्रकारचा दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यात आली नव्हती.
नोंदणी का केली जात आहे?
महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, जीएसटी काऊन्सिलने गेल्या बैठकीत निर्णय घेतला होता की पान मसाला, गुटखा आणि तत्सम उत्पादनांसाठी त्यांच्या मशीनची नोंदणी करावी जेणेकरून आम्ही त्यांच्या उत्पादन क्षमतेवर लक्ष ठेवू शकू.
मल्होत्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गेल्या वर्षीपर्यंत नोंदणी न करणाऱ्यांवर कोणताही दंड आकारला जात नव्हता. सद्य:स्थितीत यासाठी काही दंड आकारावा, असा निर्णय यावेळी परिषदेने घेतला आहे. या कारणास्तव आता नोंदणी न करणाऱ्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापर्यंत होणार?
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जीएसटी परिषदेने पान मसाला आणि गुटखा व्यवसायातील करचोरी रोखण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीच्या अहवालाला मंजुरी दिली होती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!