हे माहितीये का? पाकिस्तानकडून आलेल्या ‘या’ १० गोष्टी आपण नेहमी वापरतोय, खातोय!

WhatsApp Group

Pakistan Products : पाकिस्तानमधील आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. पाकिस्तान दीर्घ काळापासून महागाईने त्रस्त आहे. पाकिस्तानातील जनता अन्नासाठी तडफडत असल्याची परिस्थिती आहे. देशात एलपीजी सिलिंडर १० हजार रुपयांना विकला जात आहे. पाकिस्तानी रेल्वेकडेही काही दिवस इंधन शिल्लक आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान अजूनही इतर देशांकडे हात पसरून उभा आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातही अशा काही गोष्टी पाकिस्तानमधून येतात ज्या प्रत्येक घरात वापरल्या जातात.

पाकिस्तानातील ड्रायफ्रुट्स आणि फळे प्रसिद्ध

सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान अनेक देशांच्या पुढे आहे. पाकिस्तानच्या सुक्या मेव्याला अनेक देशांमध्ये चांगली मागणी आहे. भारताने २०१७ मध्ये ४८८.५ मिलियन डॉलर्स किमतीच्या पाकिस्तानी वस्तूंची आयात केली. तेव्हा भारताने पाकिस्तानातून ड्रायफ्रूट्स, टरबूजांसह अनेक प्रकारची फळे आयात केली होती. पाकिस्तानात चांगल्या दर्जाच्या फळांची मोठी बाजारपेठ आहे.

हेही वाचा – PAN Card : तुमचं पॅन कार्ड हरवलंय? लगेच करा ‘हे’ काम; होईल FIR

रॉक मीठ आणि सिमेंट

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिनानी सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानमध्ये केले जाते आणि त्याला भारतात चांगली मागणी आहे. पाकिस्तानातील मीठ, सल्फर, दगड आणि चुना यांनाही भारतात चांगली मागणी आहे. उपवासाच्या वेळी प्रत्येक घरात वापरले जाणारे रॉक मीठ पाकिस्तानमधून येते. पाकिस्तानची मुलतानी माती जगभर प्रसिद्ध आहे. चष्म्यांचे ऑप्टिकल्सही पाकिस्तानातून चांगल्या प्रमाणात आणले जातात. पाकिस्तानातूनही चामड्याची उत्पादने भारतात येतात.

पाकिस्तानी कापूस

पाकिस्तानी कापसाला भारतातही चांगली मागणी आहे. पाकिस्तानही भारताला स्टील आणि तांबे मोठ्या प्रमाणात विकतो. नॉन ऑरगॅनिक केमिकल्स, मेटल कंपाऊंड्सही पाकिस्तानमधून येतात. साखरेपासून बनवलेले मिठाईचे पदार्थही आयात केले जातात. लाहोर कुर्ता आणि पेशावरी चप्पल यांनाही भारतात चांगली मागणी आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment