गोबी मंचुरियन हा भारतीयांच्या आवडीच्या फ्यूजन पदार्थांपैकी एक आहे परंतु गोवा राज्यात त्याबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या ‘इंडो-चायनीज’ डिशवर बंदी (Gobi Manchurian Banned In Goa) का घालण्यात आली ते जाणून घेऊया.
मसालेदार आणि तिखट चटणीमध्ये फुलकोबीच्या फुलांचे मिश्रण करून बनवलेल्या या डिशवर मापुसा, गोव्यात स्वच्छतेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. ही डिश शाकाहारी लोकांना खूप आवडते. ही डिश चिकन मंचुरियनला पर्याय मानली जाते.
बंदी का?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या डिशवर आता स्टॉल्स आणि मेजवानीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मापुसाचे जिल्हाधिकारी तारक आरोलकर मंदिराच्या मेजवानीला उपस्थित असताना गोबी मंचुरियन बंदीवर गदारोळ सुरू झाला. यानंतर जिल्हाधिकारी तारक आरोलकर यांनी गोबी मंचुरियनवर बंदी घालण्याची सूचना केली. उर्वरित काऊन्सिल सदस्यांनीही याला सहमती दर्शवली.
गोबी मंचुरियन बनवताना सिंथेटिक रंग, संशयास्पद सॉस आणि कपड्यांसाठी वापरली जाणारी वॉशिंग पावडर यांचा वापर करण्यात आल्याचे समजले, त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
एमएमसीच्या अध्यक्षा प्रिया मिश्रा म्हणाल्या की, असे विक्रेते अस्वच्छ परिस्थितीत काम करतात आणि मंचुरियन बनवण्यासाठी सिंथेटिक रंगांचा वापर करतात आणि त्यामुळेच आम्हाला या डिशच्या विक्रीवर बंदी घालण्यास प्रवृत्त केले, असे नगरसेवकांचे मत आहे.
हेही वाचा – केरळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, दारु महागली!
‘इंडो-चायनीज’ पदार्थांवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये, अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आदेशानुसार मुरगाव नगर परिषद (MMC) ने श्री दामोदर मंदिरात आयोजित वास्को सप्ताह मेळ्यात गोबी मंचुरियन विक्रीच्या स्टॉलवर बंदी घातली होती.
गोबी मंचुरियन हा संपूर्ण भारतातील शाकाहारी लोकांचा आवडता पदार्थ आहे. मात्र आता गोव्यातील लोकांसाठी त्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या निर्णयानंतर दुकानदार आणि पथारीवाले खूश नाहीत. काही लोकांमुळे सर्वांना टार्गेट केले जात असल्याचे ते म्हणतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!