SSC Recruitment 2022 : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..! ७३,३३३ पदांची निघालीय भरती

WhatsApp Group

SSC Recruitment 2022 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC २०२२ च्या भरती कॅलेंडरमध्ये ७३ हजाराहून अधिक पदांची भरती करेल. अहवालानुसार, SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) देशातील विविध विभागांसाठी एकूण ७३,३३३ पदांची भरती करणार आहे. मात्र, पदांच्या संख्येतही काही बदल केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या गृह मंत्रालयात सर्वाधिक रिक्त पदे असतील. गृह मंत्रालयातील विविध विभागांमध्ये एकूण २८,८२५ पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय, दिल्ली पोलिसांमध्ये ७५५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

हेही वाचा – World Sight Day 2022 : ‘जागतिक दृष्टी दिवस’ का असतो? याचं महत्त्व काय?

गट क आणि ड साठी एकूण ७३,३३३ जागा

SSC सह भरतीसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांनी सामायिक केलेल्या तपशीलानुसार, गट क आणि ड साठी एकूण ७३,३३३ पदांची भरती केली जाईल. या सर्व भरती गृह मंत्रालय, दिल्ली पोलीस, कॉन्स्टेबल जीडी, संयुक्त पदवी स्तर परीक्षा, मल्टी टास्किंग स्टाफ, उपनिरीक्षक केंद्रीय पोलीस संघटना, संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा यांमध्ये केल्या जातील. एवढेच नाही तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने अनेक विभागांच्या भरतीसाठी जाहिरातीही दिल्या आहेत.

अर्ज कधी सुरू होतील?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलिसांच्या मल्टी टास्किंग स्टाफ (सिव्हिलियन) २०२२ च्या भरतीसाठी अर्ज ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. याशिवाय, ५ नोव्हेंबरपासून एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा २०२२ साठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर त्याच वेळी, केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबल जीडी, आसाम रायफल्सचे एसएसएफ आणि रायफलमन जीडी भर्ती २०२२ साठी अर्ज १० डिसेंबरपासून सुरू होतील.

कोणत्या पदांसाठी किती जागा रिक्त

  • कॉन्स्टेबल जीडी – २४,६०५
  • एकत्रित ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (CGLE) – २०,८१४
  • मल्टी टास्किंग स्टाफ २०२२ (MTS) – ४,६८२
  • उपनिरीक्षक केंद्रीय पोलीस संघटना – ४,३००
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी) दिल्ली पोलीस – ६,४३३
  • एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) – २,९६०
Leave a comment