Skin Care Tips : हिवाळ्यात आर्द्रतेच्या कमतरतेमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूत केवळ कोरड्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे नाही, तर हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी काही उपाय तुम्ही अवलंबू शकता. हे उपाय तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणण्याचे काम करतील. यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.
क्लीजिंग
दिवसातून कमीतकमी 2 वेळा आपली त्वचा स्वच्छ करा. चेहरा धुण्यासाठी नेहमी सौम्य क्लीन्झर वापरा. सौम्य क्लींजर त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेल काढून टाकण्याचे काम करते. तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली धूळ साफ होते. म्हणूनच तुमच्या किटमध्ये नेहमी क्लिंजर असायला हवे.
हेही वाचा- Five Eye Care Tips : डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होत चाललीय? तर आहारात करा ‘या’ ५…
टोनर
चेहरा धुतल्यानंतर टोनर वापर करा. टोनर त्वचेची पीएच पातळी राखण्याचे काम करते. यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसते. तसेच तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. टोनर म्हणून तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता. त्वचेसाठी ते खूप फायदेशीर आहे. म्हणूनच चेहरा धुतल्यानंतर टोनरचा वापर करावा.
सनस्क्रीन
त्वचेसाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरावे असे नाही. हिवाळ्यातही तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक UV (अल्ट्राव्हायोलेट) किरणांपासून वाचवण्यास मदत करते. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्याचे कामही करते. सनस्क्रीन त्वचेचा टोन असंतुलित करत नाही.
हेही वाचा- Best Time to Drink Milk : दूध कधी प्यावे; सकाळी, दुपारी की रात्री? जाणून घ्या जास्त फायदा कधी होईल
मॉइश्चराइजर
तेलकट त्वचा असलेले बरेच लोक मॉइश्चरायझर वापरत नाहीत. मॉइश्चरायझर न वापरल्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. त्वचेसाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. तेलकट त्वचा असलेले लोक जेल-आधारित मॉइश्चरायझर वापरू शकतात. ते तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते. मॉइश्चरायझर त्वचेला नैसर्गिक चमक आणते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!