SBI Recruitment 2022 : रिटायर झालेल्यांसाठी नोकरी..! पगार ४० ते ४५ हजार; ‘असा’ भरा अर्ज!

WhatsApp Group

SBI Recruitment 2022 : थकलेले आहात आणि बँकेत नोकरी शोधत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सेवानिवृत्त बँक अधिकारी पदासाठी अर्ज मागवले आहेत. SBI ने या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. १० ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्जासाठी SBI अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers  इच्छुक उमेदवार सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या या भरतीसाठी या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करू शकतात.

रिक्त पदांची संख्या

स्टेट बँक ऑफ इंडियाने सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या ४७ पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यापैकी २१ पदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

कोण अर्ज करू शकतो?

वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झालेले लोकच या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. जे स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतात किंवा राजीनामा देतात किंवा सेवानिवृत्तीपूर्वी बँकेची नोकरी सोडतात ते या नोकरीसाठी पात्र ठरणार नाहीत.

हेही  वाचा – घरात पैसा यावा म्हणून डॉक्टरनं दोन महिलांचा दिला बळी..! काळ्या जादुचा प्रकार

शैक्षणिक पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि माजी सहकारी यांच्या नियुक्तीसाठी एसबीआयने ही भरती घेतली आहे. त्यामुळे या भरतीसाठी कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. त्याचबरोबर या पदावरील कामाचा अनुभव, यंत्रणा आणि कार्यपद्धतीचे सखोल ज्ञान असलेल्या माजी अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

मुलाखतीद्वारे निवडले जाईल

SBI च्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत १०० गुणांसाठी असेल. मुलाखतीचे कॉल लेटर उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठवले जाईल. अन्यथा ते वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागतील. निवडलेल्या उमेदवारांची भरती एका वर्षासाठी केली जाईल, जी कमाल तीन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

पगार ‘असा’ असेल

  • MMGS-II रु. ४०,००० प्रति महिना
  • MMGS-III रु. ४०,००० प्रति महिना
  • SMGS-IV रु ४५,००० प्रति महिना

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२२

Leave a comment