Rules Changing from 1st November : आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या १ नोव्हेंबरच्या सुरुवातीमुळे केवळ महिनाच बदलणार नाही, तर तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित अनेक नियमही बदलतील. विमा पॉलिसी घेणे असो किंवा दर महिन्याला येणारे एलपीजी सिलिंडर असो, या सर्व सुविधा अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी अनेक बदल केले जात आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावरही होईल.
LPG सिलेंडर OTP वरून मिळेल, किंमत देखील बदलेल
दर महिन्याच्या १ तारखेला तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात आणि आवश्यक असल्यास त्यात बदलही केले जातात. उद्या पुन्हा एकदा एलपीजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आता तुम्हाला सिलिंडरच्या बुकिंगवर OTP मिळेल आणि हा OTP डिलिव्हरीच्या वेळी द्यावा लागेल, तरच तुम्हाला LPG सिलेंडर दिला जाईल.
सर्व विम्यासाठी KYC अनिवार्य
१ नोव्हेंबरपासून सर्व प्रकारच्या विमा पॉलिसींसाठी केवायसी अनिवार्य करण्यात येणार आहे. IRDA च्या सूचनेनुसार, आता जीवन विमा पॉलिसी असो किंवा सामान्य विमा, सर्व ग्राहकांना केवायसी करणे आवश्यक असेल. आतापर्यंत केवायसी केवळ आयुर्विमा पॉलिसींसाठी आवश्यक होते. आता आरोग्य आणि वाहन विम्यासाठीही केवायसी करावे लागणार आहे. आत्तापर्यंत केवळ १ लाख रुपयांच्या वरच्या दाव्यांसाठी कंपन्या त्यात केवायसी करत असत. आता ते सर्वांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे.
हेही वाचा – Sharad Pawar Hospitalized : शरद पवार यांची प्रकृती बिघडली..! ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल
पीएम किसान योजनेचा नियमही बदलला
केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक असलेल्या पीएम किसान योजनेचे नियमही उद्यापासून बदलले जात आहेत. नवीन नियमानुसार, आता लाभार्थी केवळ त्याच्या आधारद्वारे पीएम किसान पोर्टलवर स्थिती तपासू शकणार नाही. यासाठी आता त्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकही द्यावा लागणार आहे.
जीएसटी रिटर्नसाठी आवश्यक कोड
उद्यापासून देशातील लाखो व्यापाऱ्यांसाठी जीएसटीचे नियमही बदलणार आहेत. आता ५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना विवरणपत्र भरताना चार अंकी HSN कोड देणे बंधनकारक असेल. पूर्वी हा कोड दोन अंकी होता. यापूर्वी १ ऑगस्टपासून ५ कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना सहा अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले होते.
हेही वाचा – अज्ञात व्यक्तीनं विराट कोहलीच्या रुमचा बनवला Video; अनुष्का म्हणाली, “तुझ्या बेडरूममध्ये…”
AIIMS OPD मध्ये मोफत उपचार
कालपासून देशातील हजारो रुग्णांना मोठी सुविधा दिली जात आहे. आता १ नोव्हेंबरपासून एम्समधील ओपीडी फॉर्म कापण्याचे १० रुपये शुल्क रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय सुविधा शुल्काच्या नावाखाली आकारण्यात येणारे ३०० रुपयेही रद्द करण्यात आले आहेत.