ट्विटरवर ट्रेंड होतंय #RIPTwitter..! शेकडो कर्मचाऱ्यांचा स्वत: हून राजीनामा

WhatsApp Group

#RIPTwitter Is Trending : ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर अनेक ट्विटर कर्मचारी राजीनामा देत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे ट्विटरची कार्यालये बंद करण्यात आली आहेत. राजीनाम्याच्या या सत्रानंतर मस्क यांनी आता ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे.

मस्क यांचे म्हणणे आहे की, आता कर्मचार्‍यांनी स्वतः ठरवायचे आहे की त्यांनी कंपनीसाठी कठोर परिश्रम करायचे की राजीनामा द्यायचा. मस्क यांनी ईमेलद्वारे कर्मचार्‍यांना नव्याने जारी केलेल्या विधानाशी सहमत होण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना मेलला उत्तर देण्यासाठी फक्त दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्य सैनिकांसाठी चांगली बातमी..! निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

त्याच वेळी, मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर, ट्विटरची कार्यालये बंद होत आहेत आणि कर्मचारी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. नवीन बॉस मस्क यांनी ट्विटर कर्मचार्‍यांना कंपनीमध्ये कठोर नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये कामाचे तास जास्त असतील किंवा कर्मचारी राजीनामा देऊ शकतात. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. याशिवाय, वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, जे कर्मचारी या करारावर स्वाक्षरी करणार नाहीत त्यांना काढून टाकण्यात येईल आणि त्यांना कंपनीकडून तीन महिन्यांचा पगार दिला जाईल.

एलोन मस्क आणि त्यांची टीम घाबरली!

ट्विटरचे व्यवस्थापकीय संपादक जो शिफर यांनी ट्वीट केले की ट्विटरने कर्मचार्‍यांना सतर्क केले आहे, की तात्काळ सर्व कार्यालयीन इमारती तात्पुरत्या बंद केल्या आहेत आणि बॅज प्रवेश निलंबित केला आहे. त्यांनी ट्वीट केले, “कर्मचारी कंपनीची तोडफोड करतील म्हणून एलोन मस्क आणि त्यांची टीम घाबरली असल्याचे आम्ही ऐकले आहे.” मोठ्या प्रमाणात टाळेबंदीनंतर ट्विटरमध्ये ३००० कर्मचारी शिल्लक आहेत. या एकंदरीत घडामोडीनंतर ट्विटरवर #RIPTwitter ट्रेंड करत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment