Rakshabandhan 2022 : राखी बांधताना ‘या’ ५ चुका चुकूनही करू नका!

WhatsApp Group

Rakshabandhan 2022 : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी, बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर प्रेम आणि आपुलकीची राखी बांधतात आणि त्याच्याकडून त्यांच्या संरक्षणाचं वचन घेतात. यंदा राखीचा हा सण गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर राखी बांधताना लोक अनेक मोठ्या चुका करतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. राखी बांधताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि खाली दिलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत.

काय करू नये?

  • भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहिणींनी दक्षिण-पश्चिम दिशेला तोंड करावे. त्याचबरोबर भावांनी ईशान्य दिशेला तोंड करावे. यावेळई इतर कोणत्याही दिशेला तोंड असता कामा नये.
  • राखीच्या दिवशी भावाच्या मनगटावर काळ्या रंगाचा धागा किंवा राखी, तुटलेली राखी, प्लास्टिकची राखी आणि अशुभ चिन्हं असलेली राखी बांधणं टाळा. भावाच्या मनगटावर अशी राखी बांधणं अशुभ मानलं जातं.
  • राखी बांधताना भावाला जमिनीवर न बसवता पाटावर बसवावं. त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा कोणतेही स्वच्छ कापड लावायचे. यामुळं भावाचं भाग्य लाभतं. तसंच भावाच्या कपाळावर तिलक लावल्यानंतर तुटलेल्या तांदळाऐवजी अक्षता लावाव्या.

हेही वाचा – Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

  • रक्षाबंधनाला राहूकाळ आणि भद्रा काळात राखी बांधणं टाळावे. भद्रा काळात रावणाच्या बहिणीनेही त्याच्या डाव्या मनगटावर राखी बांधली आणि त्यानंतरच त्याचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, असं म्हटलं जातं. तेव्हापासून भद्रा काळात भावाला राखी न बांधण्याची प्रथा आहे.
  • राखी तीन धाग्यांची असावी. लाल, पिवळा आणि पांढरा. अन्यथा लाल आणि पिवळा धागा असणं आवश्यक आहे. संरक्षणाच्या धाग्यात चंदन लावल्यास ते खूप शुभ असतं. काहीही नसल्यास, कलावा देखील श्रद्धापूर्वक बांधला जाऊ शकतो.

रक्षाबंधनानंतर राखी मिळाली तर?

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावर राखी बांधतात. हे शक्य नसल्याची बहिणी आपल्या भावाला आगाऊ राखी पाठवतात. पण कधी कधी भावाला राखी यायला उशीर होतो आणि रक्षाबंधन संपतं. अशा परिस्थितीत ते रक्षाबंधनानंतर राखी बांधतात. धार्मिक शास्त्रानुसार जन्माष्टमीपर्यंत राखी बांधता येते. राखी उशिरा मिळाली तरी योग्य वेळी बांधा. राहूकाळात कधीही राखी बांधू नका. असं करणं अशुभ मानलं जातं. पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदा तिथीला राखी बांधू नका. असं करणंही चांगलं मानलं जात नाही. दुसऱ्या दिवशी राखी बांधणं चांगलं असतं.

Leave a comment