Fact Check India Lockdown : चीन, जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अचानक कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यानंतर खबरदारीचे डोस, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी लोकांना पुन्हा जागरुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, कोरोनाबाबत मोठा निर्णय घेत सरकारने रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात ७ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. अशा परिस्थितीत काय आहे या व्हायरल बातमीचे संपूर्ण वास्तव, जाणून घ्या…
केंद्रासोबतच राज्य सरकारही कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लोकांना मास्क घालण्याचे आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, यूट्यूबवर एका बातमीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की देशात कोरोना विषाणूची चौथी लाट आली आहे, त्यामुळे सरकार पुन्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करत आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे की सरकारने मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Fact Check : येत्या २४ तासांत बंद होणार BSNL चे सिमकार्ड? वाचा काय खरं नी काय खोटं!
CE न्यूज नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. चॅनलने आपल्या बातमीत ७ दिवस लॉकडाऊन करण्याचा दावा केला आहे. या बातमीवर पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) व्हिडिओची सत्यता तपासली आणि तपासात ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे.
संपूर्णपणे फेक न्यूज
PIB Fact Check ने बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे की ‘CE News’ नावाच्या YouTube चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की मध्यरात्री १२ पासून ७ दिवस भारत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये केलेला दावा खोटा आहे. भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
‘CE News’ नामक एक #YouTube चैनल के वीडियो में यह दावा किया जा रहा है कि आज रात 12 बजे से 7 दिन तक भारत बंद रखने का फैसला लिया गया है#PIBFactCheck
▶️ इस वीडियो में किया गया दावा फ़र्ज़ी है
▶️ भारत सरकार ने ऐसा कोई फैसला नहीं लिया है pic.twitter.com/eX3QXdkOxn
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 24, 2022
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!