

Today’s Petrol Diesel Price in Marathi : 14 मार्च 2024 (गुरुवार), तेल कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये इंधनाचे म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले आहेत. आजही त्यांचे भाव स्थिर आहेत.
मात्र, काही शहरांमध्ये त्यांच्या किमती बदलल्या आहेत. वास्तविक, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत. यावर राज्य सरकारकडून व्हॅट लावला जातो. सर्व शहरांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे आहेत. यामुळे, त्यांच्या किमती अनेक शहरांमध्ये भिन्न आहेत.
महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत (पेट्रोल डिझेलची आजची किंमत १४ मार्च २०२४)
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 94.33 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.
हेही वाचा – भारतात होणार चिप इंडस्ट्री..! PM मोदींनी केली 3 सेमीकंडक्टर प्लांटची पायाभरणी
तुमच्या शहरातील तेलाचे दर एसएमएसद्वारे कसे तपासायचे
राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये फरक आहे. तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे दररोज भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!