Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा सोमवारीही कायम आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
कच्च्या तेलाची आजची किंमत
कच्च्या तेलाच्या किमतीत आज थोडीशी घट झाली आहे, पण ती प्रति बॅरल $85 च्या आसपास आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 84.60 आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80.29 वर गेली आहे.
हेही वाचा – Furniture Care Tips : ‘या’ ३ टिप्स फॉलो करा आणि तुमच्या घरातील फर्निचर बुरशीपासून वाचवा!
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP डीलर कोड 92249 92249 वर एसएमएस करणे आवश्यक आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे ग्राहक 92222 01122 वर HPPprice डीलर कोड एसएमएस पाठवतात. बीपीसीएलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला डीलर कोड 92231 12222 वर एसएमएस करावा लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!