Petrol-Diesel Price Today : ६ महिन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? वाचा तुमच्या शहरातील नवीन दर 

WhatsApp Group

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आज तेजी पाहायला मिळत आहे. किमती घसरल्यानंतर अशी अपेक्षा होती की, दरातील ही घसरण कायम राहिल्यास सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा देईल. मात्र २४ तास उलटून गेल्याने कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

बेंचमार्क ब्रेंट क्रूड सोमवारी २८ जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आले. किंमती $२.६/बॅरल किंवा ३% पेक्षा जास्त घसरून $८०.९७ वर आल्या. रशियासह तेल निर्यातदारांच्या OPEC+ समूहाने आणखी उत्पादनात कपात करण्याच्या भीतीने किमती पुन्हा मजबूत होऊ लागल्या आहेत, दिल्लीसह देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लिटर आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये, तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपयांना विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९४.२४ रुपये दराने उपलब्ध आहे.

हेही वाचा – December Horoscope 2022 : डिसेंबर महिन्यात कोण असेल भाग्यवान, कोणाला मिळतील मोठ्या संधी? वाचा मासिक…

पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी बदलतात

इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण ठरवणारे अनेक घटक आहेत, जसे की रुपया आणि डॉलरचा विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणी इ. जून २०१७ पासून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारले जातात. व्हॅट राज्यानुसार बदलतो. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि व्हॅट जोडल्यानंतर, पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळजवळ दुप्पट होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment