

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज २७ जुलैलाही वाढतच आहेत. गुरुवारीही कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल ८३ डॉलरच्या पुढे गेली होती. बराच काळ ही किंमत प्रति बॅरल $७५ ते $८२ च्या दरम्यान दिसत होती, परंतु आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $८३ च्या वर नोंदवण्यात आली. मात्र, भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलाची किंमत
आज सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात, २७ जुलै रोजी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ ८३.७३ आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ ७९.५९ आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
IOCL नुसार, आज २७ जुलै (गुरुवार) देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
हेही वाचा – Horoscope Today: सिंह आणि तूळ राशीसह ‘या’ ५ राशींना शुभ योगाचे लाभ, वाचा संपूर्ण राशीभविष्य
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!