Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा कायम आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपये दराने विकले जात आहे.
- कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
हेही वाचा – आता पेटीएम कंपनी विकणार टॉमेटो, किती किलो दराने? वाचा!
कच्च्या तेलाची किंमत
कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे, परंतु ती अजूनही प्रति बॅरल $ 82 च्या आसपास आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $82.89 आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $79.29 आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!