Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ ८२.८९ वर पोहोचली आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ ७८.९२ आहे. गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – VIDEO : “घरोघरी एक-एक किलो सावजी मटण वाटलं, तरीही आम्ही निवडणूक हरलो”
पेट्रोल-डिझेलचे दर रोज जाहीर होतात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्ही RSP डीलर कोड ९२२४९९२२४९ वर एसएमएस करून सहजपणे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इंडियन ऑइल वन अॅप देखील डाउनलोड करू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!