Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम) पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. त्यानुसार आज (22 जुलै 2023, शनिवार) वाहनाच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एका वर्षाहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही.
कच्चे तेल 1.56 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 76.83 वर राहिले आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड तेल 1.57 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 80.89 वर पोहोचले.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. दुसरीकडे, दिल्लीत डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.35 रुपये प्रति लिटर असेल, तर एक लिटर डिझेल 94.27 रुपयांना मिळेल.
हेही वाचा – टिश्यू पेपरवर कथा लिहून जावेद अख्तर यांनी सनी देओलला सुपरस्टार बनवलं!
त्याचप्रमाणे कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्येही तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी 102.63 रुपये मोजावे लागतील, तर डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाची किंमत
पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकाला RSP लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावे लागेल. दुसरीकडे, BPCL ग्राहकाला RSP 9223112222 वर पाठवावा लागेल, तर HPCL ग्राहकाला HPPprice 9222201122 वर पाठवावा लागेल, त्यानंतर इंधनाच्या किंमतीची माहिती मिळू शकेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!