Petrol-Diesel Price : जाणून घ्या तुमचा शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

WhatsApp Group

Petrol-Diesel Price Today : सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. इंधनाच्या किमतीतील शेवटचा देशव्यापी बदल या वर्षी २१ मे रोजी झाला, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सह सार्वजनिक क्षेत्रातील OMC आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमती आणि परकीय चलन दरांच्या अनुषंगाने दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती ( Petrol-Diesel Price Today ) सुधारतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. किरकोळ पेट्रोल आणि डिझेलच्‍या किमती VAT किंवा मालवाहतुकीच्‍या शुल्‍क यांसारख्या स्‍थानिक करांमुळे राज्‍यानुसार बदलतात.

या राज्यात मिळाला होता दिलासा 

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनीही वाहन इंधनावरील व्हॅट दर कमी करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र आणि मेघालयसारख्या राज्यांनी आपापल्या पातळीवर करात कपात करून जनतेला दिलासा दिला होता.  स्‍थानिक कर, व्हॅट, मालवाहतूक शुल्‍क इ. यांच्‍या अनेक घटकांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्‍या किंमती राज्‍यानुसार बदलतात. सध्या पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचा – Daily Horoscope: आजचं राशीभविष्य, सोमवार २१ नोव्हेंबर २०२२

देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत-

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

Leave a comment