Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी विशेष बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड अजूनही $८० च्या आसपास आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बदल करण्यात आला आहे. नोएडामध्ये आज पेट्रोल ३५ पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाचे किरकोळ दर वाढलेले नाहीत.
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नोएडामध्ये पेट्रोल ३५ पैशांनी स्वस्त झाले असून ते ९६.६५ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेलही ३२ पैशांनी घसरून ८९.८२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल २७ पैशांनी घसरून १०७.३२ रुपये आणि डिझेल २५ पैशांनी घसरून ९४.११ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्येही आज पेट्रोल २२ पैशांनी स्वस्त होऊन ९६.८९ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल २१ पैशांच्या घसरणीसह ८९.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासात त्याच्या किमती जवळपास स्थिर आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $७९.७२ वर किरकोळ वाढ होत आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $७५.६३ वर पोहोचला आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Horoscope Today : सिंह आणि धनु राशीचे लोक शशी मंगल योगाने धनवान, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
दररोज सकाळी नवीन दर जाहीर केले जातात
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!