Petrol Diesel Price Today : भारतातील तेल कंपन्यांनी आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट केले आहेत. काल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ०.६१ टक्क्यांनी घसरल्या होत्या, त्यानंतर प्रति बॅरल कच्च्या तेलाची किंमत $७६.४९ वर गेली होती.
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा फटका न बसता देशातील तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. आजही तेल कंपन्यांनी देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरात तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
महानगरांमध्ये आजचे तेलाचे दर
नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे
कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे
चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे
हेही वाचा – Car Coolant : उन्हाळ्यात कारमध्ये किती कूलंट घालावं? समजून घ्या नाहीतर…
अशा प्रकारे फोनवर तेलाची किंमत मिळवा
तेल कंपन्या भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दररोज सकाळी ६ वाजता कच्च्या तेलाच्या किमतीनुसार ठरवतात. सध्या, बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $७६ वर उपलब्ध आहे.
तुम्हाला तुमच्या फोनवर दररोज तेल दराचे नवीन संदेश मिळवायचे असतील, तर तुम्ही RSP<space> पेट्रोल पंप डीलरचा कोड तुमच्या फोनवरून ९२२४९९२२४९ वर पाठवू शकता.