Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता अपडेट करतात. देशात तेलाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. परंतु राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यापूर्वी एकदा नवीन किंमत जाणून घेणे चांगले. राष्ट्रीय स्तरावर आज (गुरुवार) १५ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
देशाची राजधानी दिल्लीत आज (गुरुवार) १५ जून रोजीही एक लिटर पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर ८९.६२ रुपये इतका कायम आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
हेही वाचा – 500 लोकांना घेऊन जाणारं जहाज उलटलं, 79 जणांचा मृत्यू, इतर बेपत्ता!
दररोज सकाळी नवीन दर जाहीर केले जातात
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!