Petrol Diesel Price Today : शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल आणि ब्रेंट क्रूड ऑइल दोन्ही हिरव्या चिन्हावर व्यवहार करत आहेत. WTI ०.४७ टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल $ ७७.२५ वर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड तेल आज ०.२६ टक्क्यांनी वाढले आहे आणि प्रति बॅरल $ ८१.५७ वर व्यापार करत आहे. या वाढीनंतरही देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये दरातही वाढ नोंदवली जात आहे. त्यात एका महानगराचाही समावेश आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?
नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून ते ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९४. २७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये दराने विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोलचे दर ११ पैशांनी आणि डिझेल ०९ पैशांनी महागले असून ते १०२.७४ रुपये आणि ९४.३३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
हेही वाचा – Horoscope Today: बुध मार्गी! कन्यासह ‘या’ राशींना आज लाभ तर काहींना राहावे लागेल सावधान
शहरानुसार किंमत तपासा-
जर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर घरी बसून तपासायचे असतील तर तुम्ही एसएमएसद्वारेच पाहू शकता. त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी तेल कंपन्यांनी सुविधा दिल्या आहेत. HPCL ग्राहक ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> पाठवतात. दुसरीकडे, BPCL ग्राहकांनी ९२२३११२२२२ वर <डीलर कोड> पाठवावा आणि इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवावा. काही मिनिटांत तुम्हाला नवीन दरांची माहिती मिळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!