Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथील किमती कायम आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील (Petrol Diesel Price Today) शेवटचा बदल मे २०२२ मध्ये झाला होता. त्या काळात सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपयांनी कपात केली होती.
महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेल ८९.६२ रुपये दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९४.२७ रुपयांना विकलं जात आहे. कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे.
हेही वाचा –
पेट्रोल डिझेलचे दर दररोज निश्चित केले जातात
कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता जाहीर करतात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर, मालवाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा समावेश आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!