Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल $87.51 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.65 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.
महाराष्ट्रात पेट्रोल 62 पैशांनी तर डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 51 पैशांनी स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 47 पैशांनी तर डिझेल 43 पैशांनी स्वस्त झालं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेल 43 पैशांनी स्वस्त झाले आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी महागलं आहे. केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे.
हेही वाचा – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नींची अक्षरधाम मंदिराला भेट, म्हणाले….
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात नवीन दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!