Petrol Diesel Price : कर्नाटकानंतर गोवा सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (वाढ जाहीर केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपये आणि डिझेलच्या दरात 36 पैशांची वाढ केली आहे. मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅटमध्ये वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. शनिवारपासून (22 जून) नवे दर लागू होतील.
गोवा सरकारने 22 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढवण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारचे अवर सचिव (वित्त), प्रणव जी भट्ट यांनी शुक्रवारी या वाढीची अधिसूचना जारी केली. ते म्हणाले की 22 जूनपासून पेट्रोल 1 रुपये आणि डिझेल 36 पैशांनी महाग होणार आहे.
या वाढीनंतर किंमत काय असेल?
भट्ट म्हणाले, “व्हॅटमध्ये वाढ म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे 1 रुपये आणि 36 पैशांनी वाढतील. गोव्यात सध्या पेट्रोलचा दर 95.40 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर 87.90 रुपये आहे.”
हेही वाचा – पवन कल्याणला हरवण्याची घेतली होती शपथ, आता नाव बदलून पाळलं वचन!
कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
अलीकडेच कर्नाटक सरकारने इंधन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.05 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सेल टॅक्समध्ये सुधारणा केल्यानंतर ही वाढ झाली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा