PAN Card : जर तुमच्याकडेही पॅन कार्ड असेल आणि तुम्ही ते अद्याप आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करणे सरकारने आवश्यक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख आहे. काही कारणास्तव तुम्ही ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. पॅन कार्ड निष्क्रिय केले असल्यास, तुम्ही आयकर रिटर्नची प्रक्रिया करू शकणार नाही.
याशिवाय ५०,००० रुपयांच्या वर बँकिंग व्यवहार करणे देखील आवश्यक आहे. आयकर विभागाने नुकतेच ट्वीट केले आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांच्या वतीने पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यात आलेले नाही. आता आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्यासाठी तुम्हाला १००० रुपये द्यावे लागतील.
हेही वाचा – देशात वाढतोय कोरोनाचा धोका..! सरकारनं काय पावलं उचललीत? जाणून घ्या एका क्लिकवर
पॅन कार्ड आणि आधार लिंक कसे करावे?
- सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- येथे आधार या लिंकवर क्लिक करून लॉग इन करा.
- येथे पॅन आणि यूजर आयडी सोबत आधार कार्डानुसार नाव आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
- खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा आणि आधार कार्ड लिंकचा पर्याय निवडा.
- येथे आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. येथे तळाशी ‘Link Aadhaar’ हा पर्याय दिसेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक होईल.
यापूर्वी, आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ होती. पण आता सरकारने या दोघांना जोडण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ पर्यंत वाढवून १००० रुपये दंड आकारला आहे. काही लोकांना आधारशी पॅन लिंक करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. या लोकांमध्ये आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयातील लोक, अनिवासी भारतीय, परदेशी नागरिक आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सूट देण्यात आली आहे.