नवरात्रीत कडक उपवास धरलाय? ‘ही’ पेये तुम्हाला दिवसभर ठेवतील फ्रेश! एकदा वाचाच…

WhatsApp Group

Navaratri Fast Special Drinks : नवरात्र सुरू झाली आहे. याला शारदीय नवरात्री असेही म्हणतात. शारदीय नवरात्री या पवित्र सणात अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात, तर काही लोक दोन दिवस उपवास करतात. उपवासात फळे खाल्ली जातात, ज्यामध्ये फक्त काही प्रकारच्या गोष्टी खाण्यास परवानगी आहे. उपवासामध्ये अनेक वेळा शरीरात अशक्तपणा आणि पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे उपवासामध्ये दररोज ताजेतवाने आणि उत्साही दिसण्यासाठी काही सात्विक पेयांची यादी आम्ही शेअर करत आहोत जे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवतील.

लिंबू-संत्रा सरबत

लिंबू आणि संत्रामध्ये भरपूर सी जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडेंट असल्याने ते पिणे खूप फायदेशीर ठरत. ह्या पेयामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहाल.

केळीचा शेक

केळीचा शेक प्यायल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. ते बनवण्यासाठी प्रथम सोललेली केळी मिक्सर जारमध्ये ठेवा. त्यानंतर चवीनुसार साखर घाला आणि अर्धा कप दूध घालून बारीक करा. केळी बारीक झाल्यावर मिक्सरमध्ये आणखी दूध घालून चांगले बारीक करा नंतर तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचा शेक तयार होईल.

हेही वाचा – आयव..! शाळेच्या दप्तरातून निघाला नागोबा; पाहा व्हायरल VIDEO!

लस्सी

दह्याप्रमाणेच लस्सी पिणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लस्सी शरीरासाठी खूप थंड असते. नवरात्रीमध्ये एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही लस्सी पिऊ शकता. लस्सी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही टाका आता दह्यामध्ये थोडेसे मीठ किंवा साखर घालून ब्लेंडरच्या मदतीने मिश्रण करा. आता लस्सी पातळ करायची असेल तेवढे पाणी घाला आणि लस्सी प्यायला घ्या.

बदाम शेक

बदाम शेक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दूध गरम करावे लागेल. दूध गरम झाल्यावर पॅनमध्ये कस्टर्ड पावडर आणि वेलची घाला. १५ मिनिटे दूध गरम करा. नंतर दुधात बदाम पावडर आणि साखर घाला. आता शेक एका ग्लासमध्ये ओतून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर शेकला ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.

तुम्हालाही नवरात्रीत निरोगी राहायचे असेल तर ही पेये नक्की बनवा आणि प्या.

Leave a comment