Mother Dairy : मदर डेअरीने धारा ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्या खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) तत्काळ प्रभावाने मोठी कपात केली आहे. आता त्यांची किंमत 15 ते 20 रुपयांनी कमी झाली आहे. कमी MRP असलेला स्टॉक पुढील आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे. अन्न मंत्रालयाने खाद्यतेल उद्योग संस्था SEA ला स्वयंपाकाच्या तेलाच्या MRP मध्ये सुधारणा करण्याच्या आवश्यकतेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, धारा खाद्यतेलाची MRP विविध प्रकारांमध्ये 15-20 रुपये प्रति लिटरने तात्काळ प्रभावाने कमी केली जात आहे. ही कपात मुख्यत्वे सोयाबीन तेल, तांदूळ कोंडा तेल, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल यांसारख्या प्रकारांसाठी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रभावाचा अभाव आणि देशांतर्गत पिकांची उपलब्धता सुलभतेमुळे हे करण्यात आले आहे.
नवीन किमती
धारा रिफाइंड सोयाबीन तेल (1 लीटर पॉली पॅक) ची MRP 170 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आली आहे. धारा रिफाइन्ड राइस ब्रॅन ऑइलची MRP आता 190 रुपये प्रति लीटरवरून 170 रुपये प्रति लीटर करण्यात येणार आहे. कंपनीने धारा रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलची MRP 175 रुपये प्रति लिटरवरून 160 रुपये केली आहे. धारा शेंगदाणा तेलाची MRP 255 रुपये प्रति लिटरवरून 240 रुपये करण्यात आली आहे.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोल आणि डिझेलचे रेट बदलले! वाचा आजच्या किमती
खाद्य तेल उद्योग संस्था सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने आपल्या सदस्यांना घसरलेल्या किमतींच्या अनुषंगाने खाद्यतेलाची MRP कमी करण्याचा सल्ला दिला होता. एसईएने गेल्या तीन महिन्यांतील MRP मधील कपातीचा तपशीलही मागवला होता. मदर डेअरी ‘मदर डेअरी’ या ब्रँड अंतर्गत आईस्क्रीम, पनीर, तूप यासह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, मार्केटिंग आणि विक्री करते. कंपनी ‘धारा’ या ब्रँडखाली खाद्यतेलाची विक्री करते. यासोबतच कंपनी ‘सफल’ ब्रँड अंतर्गत ताजी फळे-भाज्या, फ्रोझन भाज्या-स्नॅक्स, पॉलिश न केलेल्या कडधान्ये, पल्प आणि कॉन्सन्ट्रेट्स इत्यादींची विक्री करते. त्याचे शेकडो दूध बूथ तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये यशस्वी रिटेल आउटलेट आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!