Modi Govt : केंद्र सरकारच्या या पावलामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण लवकरच मैदा आणि गव्हाच्या किमतीत मोठी कपात होऊ शकते. पिठाच्या गिरण्यांच्या म्हणण्यानुसार, गहू आणि मैद्याच्या किमती ५ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात. खुल्या बाजारात सुमारे ३० लाख टन गव्हाची विक्री हे त्याचे कारण आहे.
खरे तर, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी, सरकारने २५ जानेवारी रोजी आपल्या बफर स्टॉकमधून ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली होती. हा साठा पुढील दोन महिन्यांत विविध माध्यमांद्वारे सरकारी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) द्वारे विकला जाईल.
पीठ गिरणी मालकांप्रमाणे घाऊक व्यापाऱ्यांना ई-लिलावाद्वारे गहू विकला जाईल. दुसरीकडे, FCI सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स/सहकारी/संघटन, केंद्रीय भंडार/NCCF/NAFED यांना २३.५० रुपये प्रति किलो दराने गहू विकेल.
हेही वाचा – Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवताय तर थांबा..! आधी वाचा ‘ही’ गोष्ट
गहू आणि पिठाचे भाव कमी होतील
रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडिया (RFMFI) चे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी एजन्सीशी विशेष संवाद साधताना सांगितले की, आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो. हा निर्णय महिनाभर आधी घ्यायला हवा होता. हे योग्य पाऊल आहे. घाऊक आणि किरकोळ किंमती लवकरच ५ ते ६ रुपये प्रति किलोपर्यंत खाली येतील.
वर्षभरात गव्हाचे भाव वाढले
सरकारी आकडेवारीनुसार, प्रमुख शहरांमध्ये २५ जानेवारी रोजी गव्हाची सरासरी किंमत ३३.४३ रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षी या वेळी २८.२४ रुपये प्रति किलो होती. गव्हाच्या पिठाची सरासरी किंमत ३७.९५ रुपये प्रति किलो इतकी नोंदवली गेली, जी गेल्या वर्षी याच वेळी ३१.४१ रुपये प्रति किलो होती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!