पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? मोदी सरकारनं वाढवला Windfall Tax; जाणून घ्या परिणाम

WhatsApp Group

Petrol-Diesel Price Update : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. पेट्रोल लवकरच स्वस्त होईल का…? नवीन वर्षात सरकारने याबाबत मोठी योजना आखली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला दिसत नसला तरी नवीन वर्षात तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

२१०० रुपये कर लागणार

पेट्रोलियम, क्रूड ऑइल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. सरकारी आदेशानुसार आतापासून एक टन कच्च्या तेलावर १७०० रुपयांऐवजी २१०० रुपये विंडफॉल टॅक्स आकारण्यात येणार आहे. हा आदेश मंगळवारपासून लागू झाला आहे.

हेही वाचा –  SBI, HDFC आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गूड न्यूज..! रिझर्व्ह बँकेची ‘मोठी’ घोषणा

डिझेलवरही कर वाढला

यासोबतच सरकारने डिझेलच्या निर्यातीवरील करातही वाढ केली आहे. ५ रुपयांवरून ७.५ रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे, ATF बद्दल बोलायचे तर, त्याच्या विंडफॉल टॅक्सची किंमत १.५ रुपयांवरून ४.५ रुपये झाली आहे.

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?

विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) हा विशिष्ट परिस्थितीत आकारला जातो. जेव्हा एखाद्या कंपनीला किंवा उद्योगाला खूप फायदा होतो तेव्हा हा कर आकारला जातो. सोप्या शब्दात, असे देखील म्हणता येईल की जेव्हा कंपनीला कमी प्रयत्नात चांगला नफा मिळतो तेव्हा सरकारकडून विंडफॉल टॅक्स लावला जातो.

कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचे झाले तर त्यात सातत्याने वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५.५९ डॉलर्स पर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, WTI ची किंमत प्रति बॅरल ८०.११ डॉलर्सवर गेली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment